Sunday, March 30, 2025

गुढीपाडवा कथा

. *गुढी पाडव्याची बापूंनी सांगितलेली कथा* 

. हरि ॐ 

" गुढीपाडवा " ज्या दिवसाची वाट पाहत, श्री रामांची प्रतिमा डोळ्यात अखंड चौदा वर्षे धारण करणाऱ्या त्या माता कौसल्येचा तो हा दिवस . 

ज्या दिवसाची वाट पाहत, भक्तश्रेष्ठ भरताने चौदा वर्षे श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेऊन राज्यकारभार केला तो हा दिवस. 

ज्या दिवसाची वाट पाहत, चौदावर्षे त्यांच्या लाडक्या श्रीरामांप्रमाणे संन्यासी जीवनव्यथित करणाऱ्या अयोध्यावासियांचा तो हा दिवस . 

प.पू. अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या रामरक्षेच्या प्रवचनातून "गुढीपाडव्याच्या" दिवशी घडलेली कथा सांगितली होती. 

हरि ॐ ज्याक्षणाची वाटपहात सर्वांचे डोळे लागले होते तो क्षण आला, श्रीराम अयोध्येत परत आले. अयोध्येतल्या सर्व दिशांनी आनंद बहरत होता. 

सर्व चराचर वेगळ्याच मंत्रमुग्ध वातावरणात वावरत होते. त्यांचे प्राणप्रिय श्रीराम ,माता सीता, लक्ष्मणासह ,सुग्रीव आणि समस्त वानार सैनिकांसाहित परत आले होते. 

हनुमंत भक्तश्रेष्ठ भरताच्या प्रतिज्ञेमुळे आधीच पोहचले होते. राजमहालात पोहचल्यावर सर्वांचेच जोरदार स्वागत झाले. श्रीरामचंद्रानी राजमहालातील सर्वांचे क्षेमकुशल विचारले. 

नंतर श्रीराम माता सीतासह लक्ष्मण,भरत, आणि हनुमंत अयोध्येतून फेरफटका मारावयास निघाले. चौदा वर्षे संनयासाप्रमाणे जीवन जगणारी अयोध्या नगरी आज विविध रंगांनी नटलेली होती . 

विविध रांगोळ्या आणि फुलांनी रस्ते सजलेले होते .सर्व अयोध्या वासियांनी आपल्या लाडक्या श्रीरामचंद्राच्या स्वागतासाठी रंगबेरंगी वस्त्रांची गुढी दारात उभारली होती . 

सर्व अयोध्या वासीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून पंचायतन सुखावत होते, आशीर्वाद देत होते. अयोध्येचे हे सौंदर्य न्याहाळताना लक्ष्मणाची नजर एका गुढीवर गेली.जी गुढी फक्त साध्या,जुन्या वस्त्राची उभारली होती . 

त्यावर लक्ष्मणाने श्रीरामांना विचारले ," बंधू ! ती गुढीच फक्त का बरे साध्या वस्त्राची उभारली आहे?" त्यावर श्रीराम म्हणाले ,"चला आपण त्या घरात जाऊन पाहूयात.

" पंचायतन त्याघरी पोहचल्यावर त्या घरातील सर्वांना अतिशय आनंद झाला . पंचायत्नाच्या स्वागतासाठी सर्वांची एकाच लगबग उडाली . श्रीरामचंद्रा बरोबरील सर्वांचे त्यांनी योग्य रीतीने स्वागत केले.

सर्वांचे क्षेमकुशल विचारून श्रीरामचंद्रांनी प्रश्न केला ," फक्त आपल्या घरासमोरील गुढी का बरे साध्या वस्त्राची उभारली आहे ?" 

यावर त्या घरातील एक व्यक्ती म्हणाला " देवा,आपण येणार म्हणून आम्ही सर्वजण आनंदून गेलो होतो. 

पण आमच्या घरातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती खूपच आजारी होती म्हणून दुखी होतो . मनोमन तुमची प्रार्थना करत होतो कि त्यांना तुमचे दर्शन होवो.पण त्यांनी त्यांची अखेरची घटिका ओळखली होती .

त्यांनी घरातील सर्वांना जवळ बोलावून घेतले व म्हणाले,' मला काही श्रीरामांचे दर्शन घेता येणार नाही असे वाटते.माझ्याकडे आता मोजकेच श्वास शिल्लक आहेत . 

तेव्हा माझ्या मरणानंतर तुम्ही शोक करत बसू नका.त्याऐवजी श्रीरामचंद्राच्या स्वागतात आनंदाने सहभागी व्हा..' 

'माझी फक्त एकच इच्छा आहे ,तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी जी गुढी उभाराल ती मात्र ह्या वस्त्राने उभारा , कारण श्रीराम जेव्हा अयोध्येतून निघाले होते तेव्हा त्यांची चरण धूळ या वस्त्रामध्ये मला 'कृपाशीर्वाद' म्हणून मिळाली होती.' " सर्वांचे डोळे पाण्याने भरले .

श्रीरामांच्या चेहऱ्यावर अतीव करुणा दाटली होती. श्रीराम गुढी जवळ गेले व त्यांनी आपल्या कंबरेचा शेला काढला आणि त्या गुढीवर लावला व त्या गुढीवरील ते जुने वस्त्र आपल्या कंबरेला बांधले.

तो क्षण सर्वांच्या मनाला मोहून गेला.तो क्षण श्रीरामचंद्राची त्यांच्या भक्तांबध्ल असणार्या प्रेमाची साक्ष देत होता. 

त्यानंतर सर्वजण राजमहालात परत आले. आता सर्व वानार सैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम माता सीतेने आखला होता.

त्यानुसार सर्वाना भेटवस्तू, त्यांचा उचित सत्कार करण्यात आला. शेवटी हनुमंताची वेळ आली .आता माता सीतेला प्रश्न पडला की हनुमंताला कोणती भेट द्यावी? 

त्यावर त्यांनी हनुमंतालाच विचारले,"तात! आपणाला आम्ही कोणती भेट द्यावी? "त्यावर हनुमंत म्हणाले , "माते, श्रीरामांनी मला सर्व काही दिले आहे . 

पण तू म्हणतेच आहेस तर मला आज एका गोष्टीचा मोह होतोय, 'श्रीरामांनी त्यांच्या कंबरे भोवती बांधलेल्या त्या जुन्या वस्त्राचा.' " त्यावर माता सीतेने स्वतः ते जुने वस्त्र श्रीरामांच्या कंबरेचे काढले आणि हनुमंताच्या कंबरेला बांधले. भक्तांच्या प्रेमा पेक्षा त्यांच्यावर दुप्पट प्रेम करणाऱ्या श्रीरामांचा आणि हनुमंताचा सर्वांनी जयजयकार केला. 

"प.पू .बापू त्यावेळी म्हणाले होते कि," ही कथा जो कुणी गुढी पाडव्याच्या दिवशी स्मरण करेल त्याला काय मिळेल ते मी आता सांगणार नाही."

. !! हरिओम !!

Friday, January 24, 2025

क्षमासुगंध प्रार्थना (प्राकृत)

हे माझ्यावर अतिशय प्रेम करणार्‍या क्षमाशील आदिमाते, तू खूपच चांगली आहेस गं॥ 
तू आणि तुझे पुत्र मला बळजबरीनेसुद्धा तुझ्याच पायाशी ठेवोत ॥

 हे क्षमाशील आदिमाते, माझ्या त्रिविध देहातील व जीवनातील प्रत्येक कणाला व क्षणाला तुझा आशीर्वाद असू दे ॥ 

माझ्या त्वचेचा प्रत्येक बिंदू तुझी प्रार्थना करू दे ॥ आणि त्या बिंदूला तू शुद्ध कर ॥

 माझ्या मनाच्या प्रत्येक कोपर्‍याने तुझे नाम, गुण गाऊ दे ॥ आणि माझ्या मनाच्या प्रत्येक कोपर्‍याला तू स्वच्छ करीत रहा ॥

 हे क्षमाशील आदिमाते, माझ्यासमोर सगळंच्या सगळं आणून ठेवू नकोस ॥ कारण मला वेगवेगळ्या गोष्टींमधून नेमकी उचित गोष्ट निवडता येत नाही ॥म्हणून श्रीचण्डिकाकुलालाच निवड करू दे ॥

 हे क्षमाशील आदिमाते, माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तुम्ही आणि तुम्हीच निवडा ॥ निवड तुझ्या हातात आणि त्याचा प्रेमपूर्वक स्वीकार माझ्या हातात असू दे ॥ तुझ्या मनीचा संकल्प सद्गुरुंच्या शब्दांतून माझ्या कानात येऊ दे ॥ आणि आज्ञापालनाची बुद्धी माझ्या डोक्यात असू दे ॥

 हे क्षमाशील आदिमाते, जे जे चांगले तू मला दिले आहेस, ते मला आठवू दे ॥ 

आणि हे क्षमाशील आदिमाते, माझी फक्त एक इच्छा पूर्ण कर,

 मला तुम्हाला माझ्यामुळे आनंदित झालेले बघायचे आहे ॥

Thursday, January 16, 2025

किरात रुद्र सूक्त

आदिमाता महिषासुरमर्दिनीचा व तिच्या तीनही चण्डिकापुत्रांचा विजय असो ॥१॥ 

हे किरातरुद्रा, तूच मनुष्याच्या त्रिविध देहातील सर्व अवरोधांना अर्थात अडथळ्यांना तोडणार्‍या इंद्रशक्तिला बळ पुरवीत असतोस ॥२ ||
 हे किरातरुद्रा, तू माझ्या इंद्रशक्तिला बलवान कर व माझे संरक्षण होऊ दे ॥३॥ 

मेघांच्या गर्जनांइतक्या दुष्टांच्या गर्जनासुद्धा तू एका क्षणात बंद पाडतोस, मी तुझा दास आहे ॥४॥ 

हे राघवेंद्रा, माझ्या जीवनात वृत्रासुर आल्यास तू त्याचा ताबडतोब नाश कर ॥५॥ 

हे किरातरुद्रा, वृत्रासुर माझ्या जीवनात येऊच नये म्हणून तूच माझ्याकडून आदिमातेची भक्ती करवून घे ॥६॥ 

हे राघवेंद्रा, कुठलेही पिशाच मला त्रास देऊ नये म्हणून तू संयोग-वियोग अर्थात् शांभवी विद्येचा उपयोग करून माझे रक्षण कर ॥७॥ 

हे किरातरुद्रा, ही शांभवी विद्या मला सहाय्यभूत व्हावी म्हणून माझ्याकडून तूच शंभुची अर्थात् परमशिवाची भक्ती करवून घे ॥८॥

 हे राघवेंद्रा, तू अधियोग-नियोग अर्थात् पुरुषार्थविद्येचा उपयोग करून माझे सर्व बाजूंनी संरक्षण कर ॥९॥ 

हे किरातरुद्रा, तू प्रयोग निष्प्रभ करणार्‍या ज्योतिर्विद्येचा उपयोग करून माझ्यावर सोडलेल्या दुष्प्रयोगांना नामशेष कर ॥१०॥

 हे किरातरुद्रा, दत्तात्रेय, तू व परमशिव असे तिघेही माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अधिकाधिक सुरक्षित व निर्भय करा ॥११॥ 

हे किरातरुद्रा, तुझे सामर्थ्य अतर्क्य आहे व तुझी कृपा मला हवी आहे ॥१२॥ 

हे परमशिवा, तू तर अत्यंत भोळा आहेस व कृपाळूही, मी तुझे नामस्मरण करतो ॥१३॥

 हे परमशिवा, तूच मला चण्डिकाकुलाचा सदस्य बनवून माझे जीवन सफल कर ॥१४॥

 हे आदिमाते महिषासुरमर्दिनी, हे शिवे! नित्यशिव, सदाशिव व परमशिव ह्या तिघांच्याही चरणी मला सदैव आश्रय मिळू दे ॥१५॥

 हे महिषासुरमर्दिनी, तूच बिंदुमंडलवासिनी ब्रह्मविद्या आहेस, तूच एकमेव परमेश्वरी आहेस.


त्रिविक्रम उवाच : ‘‘प्रिय मित्रांनो! हे किरातरुद्रसूक्त म्हणजे सर्व चण्डिकाभक्तांसाठी वृत्रासुर व भयकारिणीच्या दुष्प्रभावांना नाहीसे करणारे सोपे साधन आहे.’’


Thursday, June 2, 2016

श्री गुरुचरण महिन

श्री गुरुचरण महिन्यात १ ० ८  वेळा  हनुमानचलिसा का पठाण करावे ह्याचे महात्म्य सांगणारी कथा आधी बघुया. 

संत तुलसीदासांच्या काळात काऴया  कुविद्देच्या उपासकांनी गंगातीरावर एकमंदिर बांधले होते त्या मंदिराचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य केवळ हनुमंतामध्येआहे हे जाणून तुलसीदासांनी श्री  हनुमंताना प्रसन्न करण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाखाली  बसून रोज तीन वेळा हनुमानचलिसा  पठणास बसले . रोज तीन वेळा म्हणजे सकाळी १ ० ८ वेळा, दुपारी १ ० ८ वेळा व संध्याकाळी  १ ० ८ वेळा आणि तेही तीस दिवस. तीस दिवसांनी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी हनुमंत  प्रकट झाले व त्यांनी ती अपवित्र वाईटवस्तु नष्ट केली. त्यामुळे तुलसीदासांना अत्यंत आनंद झाला. त्यांना आनंदात बघून हनुमानजी  तुलसीदासांना प्रश्न  करतात की," तु  एवढा आनंदित का? तुझे संरक्षण पहिल्यापासूनच होते".  त्यावर तुलसीदासजी  म्हणतात की "हनुमानजी  मी आता सर्वांना सांगू  शकतो की, आपल्या कडे भक्तीचा लवलेश ही नसताना दयाळु हनुमंतानी आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ह्या अपवित्र वस्तुचा नाश केला आहे व  आपले सर्वांचे रक्षण केले आहे. म्हणूनआपण सर्वजण हनुमंताचे स्मरण करूया. केवळ ह्या निमिताने तरी ते आपले (हनुमंताचे) नामस्मरण करतील."

त्यावर तुलसीदासांची  निष्ठा तपासण्यासाठी हनुमंतजी त्यांना उलट प्रश्न करतात "तुझ्यावर विश्वास कोण  ठेवील?". त्यावर तुलसीदासजी  वादावादी न करता हनुमानजींना सांगतात "देवा तु  म्हणतोस ते बरोबर", येवढे बोलून पुन्हा पठण करण्यास बसतात. 

त्यानंतर हनुमानजी मानवी रुपात  गावात जाऊन ४-5 जणांना सांगतात की,त्या वटवृक्षाखाली बसलेला म्हातारा पाखंडी आहे. तुम्ही जाऊन त्याला मारा. 

हनुमंताच्या मुखातील हे शब्द ऐकताच ते सर्वजण काठयांनी तुलसीदासजीवर वार करतात व त्यांना दगडानी मारतात परंतु त्यांना काहीचं होत नाही,उलट  दगड मारण्यारयाच्या उलटे येतात, ते सर्वजण घाबरतात व भीतीपोटी(प्रेमाने नाही) तुलसीदासांना शरण जातात.   त्याचवेळी तुलसीदासजी त्यांना सांगतात "माझ्याकडे काही जादू नाही, हे सामर्थ आहे त्या हनुमंतांचे, त्याच्या हनुमान चालीसा पठणाचे, तुम्ही  मारलेल्या  दगडांची काठयांची फुले  होतील व हनुमंताच्या चरणाशी पडतील, आणि तसेच होते. ते सर्वजण तुलसीदासजीकडे हनुमान चालिसा  शिकू लागतात. 

त्या रात्री पुन्हां हनुमानजी तुलसीदास  बरोबर समोर प्रकट होऊन त्यांना विचारतात "तु एवढा खुष का? तुला  काय मिळाले?", तुलसीदासजी उतरतात "तुझ्या नामाची गोडी सामान्य जनांना लागली, मला पाहिजे ते मिळालं", त्याला हनुमानजी  तुलसीदासांना विचारतात "मग त्याने  काय झाले?", त्यावर तुलसीदासानी  दिलेले उत्तर त्यांच्या भक्तीची परमोच्च स्तिथी दर्शविते, तुलसीदासजी म्हणतात "हे मी जाणत नाही, ते तू आणि लोक जाणो. मी एवढेच जाणतो की, तू व  तुझे नाम अतिशय सुंदर आहे, पवित्रआहे, तू काय करू शकतोस हे जाणून घेण्याची मला आवश्यकता नाही". कृपाळू हनुमंत प्रसन्न होतात व तुलसीदासांना सांगतात, "तू जे काहीमागायचं ते माग". 

तुलसीदासजी अत्यंत विनम्रपणे  हनुमंताना प्रार्थना करतात "हे दयाळू हनुमान जो कोणी ह्या तीस दिवसात  म्हणजे वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा ह्याकालावधीत, घरात, मंदिरात, जंगलात, किंवा शक्य असेल तेथे कुठेही बसून ३0 दिवसातून १ दिवस केवळ एकदाच १ ० ८ वेळा हनुमान चालिसाचेपठण करील त्याचे तू रक्षण कर, मात्र तू माझी परीक्षा घेतली तशी त्यांची परीक्षा तू घेऊ नकोस ". 

तुलसीदासांच्या मुखातील हे शब्द ऎकून हनुमानजी प्रसन्न होतात व"तस्थास्तु" म्हणून निघून जातात. तेव्हांपासून एका दिवसात १ ० ८ वेळाहनुमान चालिसा  म्हणण्याची प्रथा सुरु झाली.

Friday, May 20, 2016

वैशाख पौर्णिमा पूजन

  वैशाख पौर्णिमा पूजन

वैशाख पौर्णिमाच्या दिवशी सत्य,प्रेम, व आनंद ह्या पवित्र त्रीसुत्रीशी एकरूप झालेले महासिद्ध पुरुष (सदगुरू तत्व ) विशाल मानवतेच्या दृष्टीकोनातून एकत्र येतात आणि त्यावेळी ते सत्वृत्तीच्या उत्थपनाची योजना आखतात. या दिवशी सदगुरू आपल्या लाभेवीन प्रेमाची जास्तीत जास्त उधळण करतात आणि सर्व सजीव व निर्जीव सृष्टीसाठी काय उत्तम द्यायचे हे ठरवतात. या दिवशी आपण सदगुरू कडून जास्तीत जास्त स्पंदने मिळवू शकतो.
वैशाख पौर्णिमेस तीन महत्वाची प्रमाणे आहेत.

१. वैशाख पौर्णिमा हि बुद्धपुर्णिमा आहे.
२. वैशाख पौर्णिमेचा दिवस पुष्टीपती विनायकाचा जन्मदिवस मानला जातो.
३. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान वेदव्यास सर्व पृथ्वीची एक प्रदक्षिणा चौवीस तासात पूर्ण करतात असे मानले जाते कारण भगवान वेदव्यास त्यादिवशी सूर्याच्याच रथात बसून असतात.

यंदाची वैशाख पौर्णिमा शनिवार दिनांक 21/05/2016 रोजी आहे. सदगुरू बापूंनी ह्या दिवशी पुढील प्रमाणे उपासना करण्यास सांगितले आहे. 

वैशाख पौर्णिमा उपासना :-
१. प्रथम चौरंग किंवा पाट घेवून त्यावर शाल किंवा तलम वस्र घालावे, नंतर त्यावर आपल्या सदगुरूंचा व हनुमंताचा फोटो ठेवावा.

२. श्री सदगुरुंच्या फोटो प्रतिमेस सुंगधीत किंवा प्राप्त फुलांचा हार घालावा तर श्री हनुमंताच्या फोटो प्रतिमेस रुईच्या पानांचा हार घालावा.

३. दीप व अगरबत्ती लावून हात जोडावे व श्री सदगुरूंचे तसेच श्री हनुमंतांचे ध्यान करावे. ( सदगुरू तारक मंत्र – ॐ मनः सामर्थदाता श्री अनिरुद्धाय नम:)

४. त्यानंतर १. श्री अनिरुद्द कवच २. श्री हनुमान चालीसा ३. श्री हनुमान स्तोत्र ४. श्रीसाईनाथांची 11 वचने ५. श्री अनिरुद्धांची ९ वचने ६. श्री आदिमाता शुभंकर स्तवन व श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवन या पैकी कोणतेही एक स्तोत्र कमीत कमी ११ वेळा म्हणावे.

५. त्यानंतर १. आंब्याचे पन्ह २. कच्चा आंबा व भिजलेली चण्याची डाळ वाटून त्याचा प्रसाद अर्पण करावा. त्यानंतर लोटांगण घालावे.
हे दोन्ही पदार्थ मानवाला पिडणारया षडरिपुंच्या गुणांपासून मुक्त आहेत. म्हणून त्यादिवशी तरी आपल्याला त्रासणारे काम,क्रोध,मोह,मद,मस्तर, लोभ या षडरीपुंपासून दूर राहण्यासाठी हि साधी व सोपी उपासना आपण आपल्या घरी बसून दिवसभरात कधीही करू शकतो.

जो कोणी प्रेमाने वैशाख पौर्णिमेला हि उपासना करील त्याच्या घरी ह्या दिवशी आपला श्री सदगुरू श्री हनुमंता बरोबर येवून जातोच अशी ग्वाही सद्गुरू श्री अनिरुद्धानी दिली आहे.

🙏�|| मी अम्बज्ञ आहे ||🙏

Sunday, May 8, 2016

अक्षयतृतीया पुजन विधी


।। हरि: ॐ ।।

अतिरिक्त फोटो/मूर्ति यांच्या विसर्जनासंदर्भात सदगुरू  श्रीअनिरुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनातील प्रमुख मुद्दे

अक्षयतृतीयेस खालील संपूर्ण विधि दुपारी बारा वाजण्याच्या आत पूर्ण करणे.

1) स्वत: गन्ध (चन्दन) उगाळावे.

2) दोन प्रकारच्या अक्षता बनवाव्या- हरिद्रा(हळद)-अक्षता आणि कुंकुम-अक्षता.

3) फुले, गूळ-खोबऱ्याची वाटी आणि धूप ही सामग्री तयार ठेवावी.
पूजेत एकाच देवाच्या दोन तसबिरी किंवा मूर्ति ठेवू नयेत. त्याचबरोबर जे अतिरिक्त फोटो/मूर्ति विसर्जित करण्याची इच्छा आहे, ते सर्व एका पवित्र जागी पवित्र वस्त्रावर ठेवणे.

4) सर्व मूर्ति/फोटोंना गन्ध लावावे, दोन्ही प्रकारच्या अक्षता अर्पण कराव्या. त्यांना फुले वाहावी, गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा आणि धूप करावा.
मग हे सर्व एका सोवळ्यात गुंडाळून त्यांचे दुपारी बारा वाजण्याच्या आत विसर्जन करावे.

।। हरिॐ।।श्रीराम।। अंबज्ञ।।