।। हरि: ॐ ।।
अतिरिक्त फोटो/मूर्ति यांच्या विसर्जनासंदर्भात सदगुरू श्रीअनिरुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनातील प्रमुख मुद्दे
अक्षयतृतीयेस खालील संपूर्ण विधि दुपारी बारा वाजण्याच्या आत पूर्ण करणे.
1) स्वत: गन्ध (चन्दन) उगाळावे.
2) दोन प्रकारच्या अक्षता बनवाव्या- हरिद्रा(हळद)-अक्षता आणि कुंकुम-अक्षता.
3) फुले, गूळ-खोबऱ्याची वाटी आणि धूप ही सामग्री तयार ठेवावी.
पूजेत एकाच देवाच्या दोन तसबिरी किंवा मूर्ति ठेवू नयेत. त्याचबरोबर जे अतिरिक्त फोटो/मूर्ति विसर्जित करण्याची इच्छा आहे, ते सर्व एका पवित्र जागी पवित्र वस्त्रावर ठेवणे.
4) सर्व मूर्ति/फोटोंना गन्ध लावावे, दोन्ही प्रकारच्या अक्षता अर्पण कराव्या. त्यांना फुले वाहावी, गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा आणि धूप करावा.
मग हे सर्व एका सोवळ्यात गुंडाळून त्यांचे दुपारी बारा वाजण्याच्या आत विसर्जन करावे.
।। हरिॐ।।श्रीराम।। अंबज्ञ।।
No comments:
Post a Comment