हे किरातरुद्रा, तूच मनुष्याच्या त्रिविध देहातील सर्व अवरोधांना अर्थात अडथळ्यांना तोडणार्या इंद्रशक्तिला बळ पुरवीत असतोस ॥२ ||
हे किरातरुद्रा, तू माझ्या इंद्रशक्तिला बलवान कर व माझे संरक्षण होऊ दे ॥३॥
मेघांच्या गर्जनांइतक्या दुष्टांच्या गर्जनासुद्धा तू एका क्षणात बंद पाडतोस, मी तुझा दास आहे ॥४॥
हे राघवेंद्रा, माझ्या जीवनात वृत्रासुर आल्यास तू त्याचा ताबडतोब नाश कर ॥५॥
हे किरातरुद्रा, वृत्रासुर माझ्या जीवनात येऊच नये म्हणून तूच माझ्याकडून आदिमातेची भक्ती करवून घे ॥६॥
हे राघवेंद्रा, कुठलेही पिशाच मला त्रास देऊ नये म्हणून तू संयोग-वियोग अर्थात् शांभवी विद्येचा उपयोग करून माझे रक्षण कर ॥७॥
हे किरातरुद्रा, ही शांभवी विद्या मला सहाय्यभूत व्हावी म्हणून माझ्याकडून तूच शंभुची अर्थात् परमशिवाची भक्ती करवून घे ॥८॥
हे राघवेंद्रा, तू अधियोग-नियोग अर्थात् पुरुषार्थविद्येचा उपयोग करून माझे सर्व बाजूंनी संरक्षण कर ॥९॥
हे किरातरुद्रा, तू प्रयोग निष्प्रभ करणार्या ज्योतिर्विद्येचा उपयोग करून माझ्यावर सोडलेल्या दुष्प्रयोगांना नामशेष कर ॥१०॥
हे किरातरुद्रा, दत्तात्रेय, तू व परमशिव असे तिघेही माझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अधिकाधिक सुरक्षित व निर्भय करा ॥११॥
हे किरातरुद्रा, तुझे सामर्थ्य अतर्क्य आहे व तुझी कृपा मला हवी आहे ॥१२॥
हे परमशिवा, तू तर अत्यंत भोळा आहेस व कृपाळूही, मी तुझे नामस्मरण करतो ॥१३॥
हे परमशिवा, तूच मला चण्डिकाकुलाचा सदस्य बनवून माझे जीवन सफल कर ॥१४॥
हे आदिमाते महिषासुरमर्दिनी, हे शिवे! नित्यशिव, सदाशिव व परमशिव ह्या तिघांच्याही चरणी मला सदैव आश्रय मिळू दे ॥१५॥
हे महिषासुरमर्दिनी, तूच बिंदुमंडलवासिनी ब्रह्मविद्या आहेस, तूच एकमेव परमेश्वरी आहेस.
त्रिविक्रम उवाच : ‘‘प्रिय मित्रांनो! हे किरातरुद्रसूक्त म्हणजे सर्व चण्डिकाभक्तांसाठी वृत्रासुर व भयकारिणीच्या दुष्प्रभावांना नाहीसे करणारे सोपे साधन आहे.’’
No comments:
Post a Comment