Monday, November 3, 2014

तुलसी विवाह

   As per Hindu calendar, Tulsi Vivah (तुलसी विवाह) duration begins from eleventh day (ekadashi) of bright fortnight of Kartik month to the full moon (Kartik Poornima) of the month i.e. from Kartik ekadashi to Kartik Poornima.
   As per Hindu mythology, Tulsi was actually a woman named Vrinda who was married to a demon king named Jalandhar. Vrinda worshiped Lord Vishnu and prayed for her husband to be invincible. No God was able to defeat Jalandhar because of Vrinda. However, Vishnu disguised himself as Jalandhar and violated Vrinda. Her chastity destroyed, Jalandhar was killed by Shiva. When Vrinda came to know about the truth, she cursed Lord Vishnu and turned him into a black stone (Saaligram) and burnt herself on her husband’s funeral. Lord Vishnu then transferred her soul in Tulsi plant and as a blessing married her in next birth as Saaligram. Since then the tradition of Tulsi Vivah (तुलसी विवाह) came in existence.
  



Thursday, October 23, 2014

लक्ष्मी पुजन

Lakshmi is the goddess of light, beauty, good fortune and wealth. While Laxmi is generally worshiped to achieve success, she does not reside long with anyone who is lazy or desire her only as wealth. 


Sunday, October 19, 2014

गोवत्सद्वादशीच्या दिवशी

Hari om
‘ॐ श्री सुरभ्यै नम:।’ (Om Shree Surabhyai Namah) - Aniruddha Bapu Marathi Discourse 14 Nov 2013
गोवत्सद्वादशीच्या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी गोपद्मं अवश्य काढावीत आणि त्या दिवशी ‘ॐ श्री सुरभ्यै नम:।’....

॥ हरि ॐ ॥ सद्गुरू श्री अनिरुद्धांचे " गोपद्म" ह्या अल्गोरिदम वर झालेले प्रवचन सारांश - उद्या वसुबारस आहे त्यानिमित्ताने पोस्ट करत आहोत. -

ॐ मंत्राय नम: ॐ रामवरदायिनी बघताना आपल अनेक algorithem बघत चाललो आहेत. हे algorithem म्हणजे विश्वाची रचना आहे. म्हणजेच स्वत:चीच रचना आहे. म्हणून हे algorithem आमच्या नित्याच्या जीवनात व्यवस्थित बसतात, काम करत असतात. हे फक्त ऐकून सोडून चालणार नाही.

असाच एक आदिमातेचा algorithem आहे. कुठलेही शुभकार्य असताना स्वस्तिक सोबत दारात गोपद्म काढतात. चार गोपद्म काढली जातात.

आम्हाला माहीतच आहे गाय पवित्र आहे म्हणून तिची चार पावले काढली जातात. सध्या ३ दिवस तुलसी विवाहाचे दिवस आहेत. पूर्वी तुळशी वृंदावन असायचे तिथे सकाळ संध्याकाळ गोपद्म काढली जायची.

ज्यांच्या घरी गौरी येते त्यांना माहीत असेल दारात गोपद्म काढल्याशिवाय गौरीला आत आणत नाहीत का? म्हणजे  कुठेतरी देवीतत्वांशी ह्याचा संबंध आहे.

तुळशी वृंदावनासोबत अजून एका ठिकाणी गोपद्म काढली जातात? कुठे? गोपद्म काढणे अत्यावश्यक मानले जाते? प्रत्येक स्त्री ती गोष्ट दरवर्षी करतेच ती म्हणजे भाऊबीज.

भाऊबीजेच्या दिवशी जेव्हा पाटावर बसून ओवाळले जायचे तेव्हा गोपद्म काढले जायची भाऊबिजेशी गोपद्मचे नाते काय?

हा गोपद्म जेव्हा algorithem म्हणून समजून घ्यायचा तेव्हा आपल्याला काय जाणून घ्यायचे. आदिमातेची तीन स्वरूपं स्थूल (अनसूयामाता), सूक्ष्म (महिषासुरमर्दिनी माता) व तरल (गायत्रीमाता) पातळीवरची पण ह्या आधीची दत्तगुरूंची ’नि:स्पंद’ जाणीव म्हणजे अदिती.

गोपद्म म्हणजे गोमातेची चार पावले आहेत.

दिवाळीची सुरुवात वसुबारसच्या दिवशी होते. या दिवशी पूर्वी गाय व तिचा वत्स म्हणजेच वासराचे पूजन केले जायचे.

सप्तपदीच्या वेळी तुम्ही ७ पावले घेता त्या ७ पावलांबरोबर, ७ शपथा, ७ promises, ७ वचने असतात.

इथे गोमातेची ४ पावले आहेत. ह्या पावलांसोबत गोमाता काय घेते हे बघायला हवे.

ही गाय आपल्या भारतीयांसाठी पवित्र आहे. म्हणजे नक्की काय? प्रत्येक गाय ही भारतीयांनी कामधेनू मानलेली आहे.

कामधेनू नावाची गाय जी ऋषी वसिष्ठांकडे होती ती आधी जमदग्निकडे होती. ही कामधेनू म्हणजे तिच्यावरच्या प्रेमाने ज्यांनी तिला माता मानले त्यांना तिने पाहिजे ते पुरवले.

पण ज्यांनी मदांध बनून तिला भोग्य मानले त्या प्रत्येकाचा तिने नाश घडवून आणला. ह्या कामधेनूचा अंश प्रत्येक गोमातेत असेल असा वर गोमातेला मिळाला म्हणून आम्ही गाईला पवित्र मानतो. आजही गोमातेला जे नमस्कार करतात ते मला आवडते.

कुठलेही पाप चालेल पण गोमांस खाण्याचे पाप कधीही करू नका. एकवेळ ऊपाशी रहा पण गोमांसला स्पर्शदेखील करू नका. 

गोमाता जेव्हा जगेल तेव्हाच हिंदुस्तान जगेल. गोमांसला कधीही, चुकुनही स्पर्शही करु नका. जेव्हा नॉनव्हेज खायला बाहेर जाल तेव्हा हे कन्फर्म करा. चीझ खातानाही ते चीझ व्हेज आहे ह्याची खात्री कारा. गाय ही आपल्याला अतिशय पुजनीय आहे आणि गोमातेचे रक्षण करणे हा आपला धर्म आहे. 

तुम्ही जेव्हा non-veg जेवायला बाहेर जाता तेव्हा एखादे पदार्थाचे नाव कळले नाही तर विनासंकोच विचारा, कुणाचे मांस आहे ते. चुकून खाल्ले तर मी त्यातून बाहेर काढू शकेन, पण मुद्दामहून कधीच गोमांस खाऊ नका.

cheese खाताना पण विचारा ते veg आहे की non-veg आहे. काही ठिकाणी cheese गोमातेच्या enzymes पासून बनवले जातात. अभक्ष भक्षण केलं तर त्याचं पाप लागणारच. म्हणून शाकाहारी cheese खाण्यासाठी आग्रह करा. ह्या आधी चुकून खाल्ले गेले असेल तर ते पाप मी धुऊन टाकले. त्याची काळजी करू नका. यापुढे मात्र दक्ष रहा.

गोमांस व गोहत्येचे पाप आपल्याला लागता कामा नये. पॅकेजवर हिरवा dot असतो. तो बघून veg cheese वापरा.

समजा चुकून खाल्ले गेले तर शांतपणे सांगा अनिरुध्दा मी विसरलो. अशावेळी माझ्यासाठी सोपे आहे.

म्हणून गुरुपौर्णिमेला मी सांगतो तुमची पापं मला द्या.

आदिमातेचे नियम तिच्या बाळांसाठी आहेत. तुम्ही तिचे कैदी नाहीत. त्या नियमांचे पालन करुन घेण्याचे काम तिने तिच्या पुत्रांकडे दिलं आहे. प्रत्येक घरी शिस्त बाणणं अत्यंत आवश्यक असते.

कामधेनू ही संकल्पना वैदिक आहे. कामधेनू म्हणजे काय? तर आदिमातेची सर्व मंगल करण्याची इच्छा मनुष्याला ज्या शक्ती नाडीद्वारे प्राप्त होते. त्या शक्ती नाडीसच ऋषीमुनी कामधेनू म्हणतात.

शक्ती नाडी म्हणजे आईच्या गर्भात बाळ नाळेशी जोडलेलं असतं त्याचप्रमाणे तुम्ही सगळेजण त्या आदिमातेशी नाळेद्वारे direct जोडलेले असतात त्यालाच शक्ती नाडी असे म्हणतात तीच कामधेनू.

ही असते कुठे? जे जे म्हणून पृथ्वीच्या, वसुंधरेवर जे जे म्हणून अवकाशातून खाली येते. त्या प्रत्येक गोष्टीत ह्या शक्ती नाडीचे अस्तित्व असते.

पृथ्वीच्या ionic sphere च्या खालून जे येते ते शक्ती नाडी, पावसाचा प्रत्येक थेंब, सूर्याचा प्रत्येक किरण हे शक्ती नाडी स्वरुप आहे.

चंद्रप्रकाश हे शक्तीनाडी स्वरूप आहे. वीज हीसुध्दा शक्तीनाडी स्वरूप आहे.

sunlight (सूर्याचा प्रत्येक किरण)

moonlight (चंद्राचा प्रत्येक किरण)

rain (पावसाचा प्रत्येक थेंब)

electricity (आकाशात कडाडणारी वीज)

ह्या चार गोष्टी पृथ्वीवर आल्यानंतर येत असताना, २४ तासापर्यंत शक्तीनाडीचे काम करत असतात. २४ तासापर्यंत अहोरात्र १ दिवस - १ रात्र त्यांच्यात शक्तीनाडीचे कार्य करण्याची क्षमता असते.

ह्या २४ तासात जे पावसाचे पाणी जी झाडे खेचून घेतील ती झाडे पण शक्तीनाडीचे काम करतात.

तसेच सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश शक्तीनाडीचे काम करत असतात.

वरती चमकणारी वीज आपल्या शरीरात खेळतच असते. विद्युत शक्ती ही प्रत्येक मानवाच्या शरीरात असते. मेंदूत electrical impulse असतात. Heart-beat electricity मुळेच चालू आहेत. ही विद्युत शक्ती म्हणजेच कामधेनू आहे. शक्तीनाडी स्वरूप आहे.

गोविद्यापिठम्‌ मध्ये गाईंची सुंदर जोपासना केली जाते. तिथे गोग्रासची सुविधा आहे.

तुम्ही जेव्हा एका गाईला पवित्र मानून पूज्य मानून तिचे पूजन करता, तिला जगवता, मानता तेव्हा तुमच्या शरीरातील विद्युतशक्ती समर्थ बनते, बलवान होते. म्हणजेच तुमच्या शरीरातील इच्छा शक्ती ही कामधेनू बलवान करते. गाईच्या चार पावलापैकी कामधेनू हे तिचे स्वरूप हे तिचे पहिले पाऊल.

गाईची ४ पावले म्हणजे

१. कामधेनू स्वरूप - पहिले पाऊल

२. गायत्री मंत्र - दुसरे पाऊल

३. विश्वात्मक शक्तीनाडी - तिसरे पाऊल

४. देहस्थ शक्तीनाडी - चौथे पाऊल

गायत्री मंत्रावर मी  ३ १/२ तास बोललो होतो. गायत्री मंत्र म्हणजे काय? आपल्या धृतीला प्रज्ञेला (बुद्धीला) प्रकाशित करण्यासाठी त्या सवितृला (दत्तगुरूंना) केलेले आवाहन आहे.

आम्हाला गायत्री मंत्र म्हणावासा वाटला तर सद्‍गुरु गायत्री मंत्र म्हणावा. कुणाला गायत्री मंत्र सकाळी म्हणायचा असेल तर १२ वेळा म्हणावा. गायत्री मंत्र केवळ ब्राम्हणांनी म्हणावा हा चुकीचा समज आहे.

हे गोपद्म म्हणजे ह्या कामधेनूची ४ पावले आहेत. गोपद्ममध्ये माझ्या लहानपणी जी पध्दत पाहिली ती म्हणजे २ पावले माझी आई कढायची व २ पावले वडील काढायचे.

गोपद्मावर साधी हळद-कुंकू वाहा. ही कामधेनू आमची इच्छाशक्ती वाढवणारी आहे.

मातेची जी इच्छा आहे, जी सर्व पुरुषार्थ देणारी आहे.

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंब्यके गौरी नारायणी नमोस्तुते

कामधेनू सूक्त म्हणणे कठीण आहे. कामधेनू सूक्ताचं पठण करून हवन केल्यावर जे यागाचं पुण्य मिळतं तेच पुण्य ही चार गोपद्म घराच्या उंबरठ्यावर किंवा देव्हार्‍यासमोर काढली व त्यावर हळद कुंकू वाहिलं की मिळतं.

कामधेनू - सूक्ष्म रूपात

गायत्री मंत्र - ध्वनी रूपात

विश्वात्मक - विद्युत रूपात

देहस्थ शक्ती - देहस्थ विद्युत

जे आदिमातेने तयार केले ते माणसाला सहज पेलता यावे यासाठी ती algorithem तयार करते.

प्रत्येक गाईत हा कामधेनूचा जर अंश असेल तर प्रत्येक गाय पूज्य असलीच पाहिजे. पूर्वी श्रावणी सोमवारी गाईला एक ताट दिले जायचे.

दुष्काळग्रस्त भागात चारा मिळत नाही, त्यामुळे गुरे कसायाच्या हातात जातात. म्हणून आपण चारा लावतो आणि अशा गुरांना देतो.

पूर्वी दारासमोर रोज सारवून गोपद्म काढली जायची. आपण रोज देवासमोर उंबरठ्याबाहेर गोपद्म काढू शकतो.

जेव्हा मंगलयान गेले तेव्हा सगळे scientist प्रथम त्याची प्रतिकृती घेऊन तिरुपतीकडे गेले. परमेश्वराच्या चरणी जायची त्यांना लाज वाटली नाही.

आम्ही उदी लावताना, नमस्कार करताना पण लाजतो.

सणासुदीच्या दिवशी तरी गोपद्म काढा. ३ तासाच्या कामधेनू सुक्ताऐवढेच पुण्य गोपद्म काढल्याने मिळते.

ज्या घरासमोर गोपद्म काढले जाते त्या घरातील प्रत्येकाला त्याचे पुण्य लाभतेच अशा घरात जेव्हा तुमचा शत्रू तुमच्या घरी आत येतो तेव्हा त्याची वाईट करण्याची शक्ती नाहीशी होते.

म्हणून गोपद्म उंबरठ्यावर काढले जाते. ज्या घरासमोर गोपद्म असतील त्या घरातून बाहेर जाताना प्रत्येक व्यक्ती शुभ ताकद घेऊन जाणार आहे.

वसुबारसच्या दिवशी गोपद्म अवश्य काढा त्या दिवशी ” ॥ ॐ श्री सुरभ्यै नम: ॥ ” हा मंत्र म्हणा. सुरभी म्हणजे कामधेनू. हा मंत्र कमीतकमी ५ वेळा म्हणा. हा कामधेनूचा श्रेष्ठ मंत्र मानला जातो ह्या मंत्राचा जप वसिष्ठांनी केल्यामुळे त्यांना अख्खीच्या अख्खी कामधेनू प्राप्त झाली.

ही गोपद्म अवश्य घरासमोर काढावीत हा कामधेनूचा मंत्र आपण दररोज देखील म्हणू शकतो.

जेव्हा जेव्हा पाडवा, भाऊबीजेला औक्षण कराल तेव्हा नक्की गोपद्म काढा.

॥ हरि ॐ ॥
उद्या वसुबारस आहे
दारात गोपद्म काढणे आणि
॥ॐ श्री सुरभ्यै नमः॥ हा मंत्र कमीत कमी ५ वेळा म्हणणे.
          प. पू सदगुरु श्री अनिरुद्ध बापू

 (Click the below link to watch the video)


प्रत्येक श्रद्धावान गायीला माता मानतो, तिची पूजा करतो. गोमातेच्या पावलांचे चिह्न उंबरठ्यावर, घरासमोर, देवघरात दररोज काढले जाते. गोवत्सद्वादशीच्या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी गोपद्मं अवश्य काढावीत आणि त्या दिवशी ‘ॐ श्री सुरभ्यै नम:।’ हा मंत्र कमीतकमी ५ वेळा म्हणावा. ‘ॐ श्री सुरभ्यै नम:।’ हा कामधेनूचा श्रेष्ठ मंत्र आणि गोपद्मांचे महत्त्व याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १४ नोव्हेंबर २०१३ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.


http://aniruddhafriend-samirsinh.com/om-shree-surabhyai-namah/
Ambadnya




Friday, October 17, 2014

श्री धनलक्ष्मी आणि श्रीयंत्रपूजन उत्सव

श्री धनलक्ष्मी आणि श्रीयंत्रपूजन उत्सव

Dhanalakshmi Poojan
श्रद्धावानांनो गुरुभक्ती वाढविणारे, आई आल्हादिनीची प्रेमकृपा वृद्धींगत करणारे, षोडस ऐश्वर्याचा मार्ग सुलभ करून देणारे आणि सदगुरु श्री अनिरुद्धांनी सिद्ध केलेल्या श्रीयंत्राचे दर्शन व पूजन (अर्चन) करून महात्रिपुरसुंदरी आई आल्हादिनीची कृपा प्राप्त करुन घेऊया.

सर्वप्रथम आपण श्रीयंत्राचा महिमा जाणून घेऊया.

श्रीयंत्र म्हणजे "श्री" चे यंत्र. श्रीचे घर. श्री म्हणजे "श्रीविद्या". ललिता, महात्रिपुरसुंदरी षोडशी आणि कमला कामेश्वरी ही माता श्री विद्येचीच नाव आहेत. श्रीविद्येचे एक नाव "क्रियात्मक ब्रह्म" अस आहे. म्हणजे ह्या सृष्टीची प्रत्येक क्रिया ह्या श्रीविद्येच्या नियम सामर्थ्याप्रमाणेच चालते. म्हणून श्री म्हणजे श्रेष्ठता, श्री म्हणजे पूजनीय आणि श्री म्हणजे षोडस ऐश्वर्य प्राप्तीचे साधन.

ह्या विश्वाचे संपूर्ण शक्तिसामर्थ्य आणि ऐश्वर्य "श्री"च्या अधिन आहे. म्हणून मानवाला महत्रिपुरसुंदरी असलेल्या आईचे प्रेम, तिचे षोडश ऐश्वर्य व शक्तिसामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी श्रीयंत्राची उपासना व पूजन अत्यंत फलदायी मार्ग आहे. तसेच ते गुरुभक्ती वाढविणारेही आहे.

सदगुरु कृपेमुळे श्रीयंत्र श्रद्धावानांना उत्तम फलप्राप्ती करून देते. श्रीयंत्र केवळ घरात जरी ठेवले तरी ते लाभदायी आहे, तर त्याचे श्रद्धापूर्वक पूजन व दर्शन मानवासाठी इच्छातृप्ती करणारे आहे. म्हणून श्रीयंत्राला अर्थात श्रीविद्येला शरण जाऊन "श्री"च्या शक्तीचा आनंद घेणे हाच स्वहित साधून घेण्याचा उत्तम मार्ग आहे.

धनलक्ष्मी पूजनाच्या दिवशी श्रीयंत्र पूजनाची व दर्शनाची संधी श्री हरिगुरुग्राम म्हणजेच न्यू इंग्लिश स्कूल , वांद्रे (पूर्व) येथे सकाळी ९ ते रात्रो १० वाजेपर्यंत श्रद्धावानांना प्राप्त झाली आहे.

तसेच सदगुरु श्री अनिरुद्धांनी सिध्द केलेले श्रीयंत्र आपल्याला घरी ही उपासना करण्यासाठी उपलब्ध झालेले आहे.
"रुद्रायामल" ग्रंथामध्ये श्री यंत्राच्या दर्शनाने जी फलप्राप्ती होते त्याचे सुरेख वर्णन केले आहे. आपल्यला "रुद्रायामल" ग्रंथ सांगतो की, सर्व तीर्थस्थळे व मंदिरे यांच्या दर्शनाने तसेच १६ प्रकारची व्रते करून जी फलप्राप्ती होते त्यापेक्षा अधिक फलप्राप्ती होते त्यापेक्षा अधिक फलप्राप्ती श्री यंत्राच्या नित्य दर्शनाने होते.

अशा सदगुरु श्री अनिरुद्धांनी सिद्ध केलेल्या श्रीयंत्राची रचना कशी आहे ते आता आपण बघूया. श्रीयंत्राच्या मध्यभागी सर्वश्रेष्ठ महाशक्ती श्रीविद्या, महालक्ष्मी, महात्रिपुरसुंदरी विराजमान झालेली आहे.

श्रीयंत्रात चार परमेश्वर स्वरुप उर्ध्वाशिर्ष त्रिकोण आहेत. पाच शक्तीरुप अधोशिर्ष त्रिकोण आहेत. असे एकूण नऊ त्रिकोण मध्यबिंदुच्या विविध दिशांना आहेत. तसेच ह्या श्रीयंत्रामध्ये एकूण ४३ त्रिकोण आहेत व प्रत्येक त्रिकोणा  त देवीचे निवास आहे. हा त्रिकोण समुह अष्टदलचक्रांनी परिपूर्ण असतो, ज्याच्या बाहेर षोडशदल, त्रिवलय आणि सर्वांच्या बाहेर भूपुर म्हणजे चतुष्कोन आहे.

श्री यंत्रात असलेले २४ संधी व २८ मर्म आहेत. म्हणजे काय? व त्यांचे कार्य काय आहे? ते आपण आता बघुया. दोन रेषांच्या संगमाला संधी म्हणतात आणि तीन रेषांच्या संगमाला मर्म म्हटले जाते. सन्धि आणि मर्म ही श्री चक्राची स्पंदन प्रक्षेपक केंद्र आहेत.

श्री चक्राच्या अष्टदल कमलामध्ये अष्टलक्ष्मीचा निवास असतो. . त्या अष्टलक्ष्मी कोणत्या? तर
१) आणिमा - श्री वरदलक्ष्मी
२) लधीमा - श्रीधनदालक्ष्मी
३) प्रकाम्य - श्रीपद्मलक्ष्मी
४) वचिता - श्रीकमलालक्ष्मी
५) महिमा - श्रीमहालक्ष्मी
६) प्राप्ती- श्रीश्रेष्ठालक्ष्मी
७) इशिता - श्रीवसुधालक्ष्मी
८) ख्याती- श्रीकाम्यालक्ष्मी
तसेच चक्राच्या षोडशदलात सोळा कुबेर राहतात. श्रीयंत्रातील कुबेराची उपासना त्वरित फलदायी आहे.

पूजन केल्यानंतर श्रीयंत्र आपल्या देवघरात किंवा द्रव्यपेटीमध्ये ठेवू शकतो. श्रीयंत्राच्या केवळ अस्तित्वामुळे आपल्याला लाभ होऊ शकतो. आपल्या घरी कुंकू, अक्षता, सुगंधीत पुष्प आणि सुगंधी धूप ओवाळून आपण ह्याची पूजा करू शकतो. व  त्यानंतर दूध, खीर, किंवा मिठाईचा नैवेद्य अर्पण करू शक्तो. श्रीयंत्र महाप्रेममयी आनंददायिनी श्रीमताचे घर असल्यामुळे व सदगुरु सिद्ध असल्यामुळे पूजन करताना काही चूक झाली तरी पूजकाला कोणतीही हानी होत नाही तर पूजकाला हे श्रीयंत्र लाभदायच ठरते.

श्रीयंत्रासमोर बसून नियमितपणे किंवा आपल्या इच्छेनुसार कोणते जप करू शकतो?
१. ॐ श्री र्‍हीं क्लीं र्‍हीं महालक्ष्मै नमः।
२. ॐ र्‍हीं सकलसर्वभूषितां ललीतादेवी नमामि।
३. ॐ र्‍हीं महात्रिपुरसुंदरी दैव्यै नमो नमः ।
४. ॐ श्री कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं र्‍हीं ॐ महालक्ष्मै नमो नमः।
५. ॐ आल्हादिन्यै नंदायै संधिन्यै नमो नमः।
वरीलपैकी कोणत्याही एका मंत्राचे पठण करू शकता.
सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे धनलक्ष्मी आणि श्रीयंत्रपूजन उत्सव कसा साजरा होतो?
सकाळी ९ वाजता १) श्रीयंत्र पूजन २) वैभवलक्ष्मी धनलक्ष्मी पूजन. ३) दत्तमाला मंत्र पठण व यज्ञ ४) श्रद्धावानांतर्फे श्रीयंत्राचे अर्चन (पूजन)

परमपूज्य सदगुरुंचे आगमन झाल्यावर, दर्शन सोहळा सुरु होण्याआधी सदगुरु स्वतः श्रीयंत्राचे पूजन व आरती करतात. श्रीयंत्राची आरती झाल्यानंतर प्रत्येक तासाला श्री महालक्ष्मीची आरती केली जाते. सदगुरु व त्यानंतर सदगुरु व त्यामच्या भक्तांचा प्रेमळ संवाद म्हणजेच दर्शन सोहळ्यास सुरुवात होते.

ह्या उत्सवाच्या दिवशी केंद्रांना दिल्या जाणार्‍या पादुकांची सिद्धता परमपूज्य सदगुरूच्या चरणकमल स्पर्शाने केली जाते व ह्यात सिद्ध पादुका प्रत्येक केंद्राला अधिवेशनाच्या वेळेस दिल्या जातात.

रात्रीच्या महाआरतीच्या वेळेस स्वतः सदगुरु दत्तात्रेयांची आरती करतात व त्यानंतर श्रद्धावान परपूज्य सदगुरुंची आरती करतात. महाआरतीनंतर सत्संग व गजराच्या जयघोषात उत्सवाची सांगता होते.
Samirsinh Dattopadhye

Thursday, October 2, 2014

Vijayopasna - Dasara

विजयादशमी (दसर्‍याच्या) दिवशी करावयाचे श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती पूजन                                     विजयादशमी म्हणजेच दसर्‍याच्या दिवशी सद्‌गुरु अनिरुध्द बापूंनी सांगितल्याप्रमाणे श्रध्दावानांनी श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वतीचे पूजन करणे श्रेयस्कर असते. ते कसे करावे व का करावे ह्याची माहिती स्वत: बापूंनी  गेल्या वर्षी प्रवचनामध्ये सांगितल्याप्रमाणे खाली देत आहे.
पूजनासाठी एका दगडी पाटीवरच श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती च्या खाली दिलेल्या प्रतिमा प्रेमाने काढाव्यात व त्यांचे मन:पूर्वक पूजन करावे. ही दोन्ही चित्रं बाजू-बाजूला काढायची असतात.
आपल्या जीवनाचे भाग्य आपण घडवतो. पण त्यासाठी लागणारी उर्जा ह्या प्रतिकांमधून आपल्याला मिळते. ज्ञानाने प्रेमाची पूजा व प्रेमाने ज्ञानाची पूजा ह्यांचे एकत्रिकरण म्हणजे ह्या दोन प्रतिकांची पूजा. मानवाच्या हातून घडलेल्या निर्मितीची पूजा.
संपूर्ण सृष्टीतले ज्ञान आम्ही नाही पेलू शकत, ते अफाट आहे. ज्ञान म्हणजे फक्त डिग्री नव्हे. त्यामुळे आपल्या जीवनासाठी आवश्यक तेवढे ज्ञान आपल्याला ग्रहण करता यावे ह्यासाठी हे पूजन आहे.
ही चिन्हं दगडी पाटीवरच का काढावीत? कारण पहिले लिहिले गेलेले / कोरले गेलेले वा‌‌ङ‌‌‍मय दगडावर‌ कोरले गेले होते व जी गायत्रीमातेची पहिली प्रतिमा श्रीपरशुरामाने काढली ती त्याने पाषाणावर काढली होती. म्हणून दगडी पाटीवरच ह्या प्रतिमा काढाणे श्रेष्ठ व श्रेयस्कर.
श्रीसरस्वतीची प्रतिमा प्रथम प्रशुरामाने काढली व धारिणीने रेखाटली. श्रीसरस्वतीला आपण शिक्षणाची देवता मानतो. सरस्वतीच्या प्रतिमेत शिवत्रिकोण व शक्तीत्रिकोण (उलटा त्रिकोण) आहेत. शिवाय सरस्वती चिन्हात १ चे ७ आकडे असतात. हे ७ वेळा १ म्हणजे सप्तस्वर आहेत, मराठीतील “सा, रे, ग, म, प, ध, नी, सा” व इंग्लिशमधील “डो, रे, मी, पा, सो, ला, मी”. अनसूया मातेचा जन्म ही सप्तस्वरातूनच झाला. सप्तस्वर म्हणजे अनसूयेच्या निर्मितीच्या वेळी प्रत्येक वेळेला उमटलेला ध्वनी आहे. १ चे ७ आकडे म्हणजे आदिमाते़च्या आमच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे पूजन आहे. ह्या सप्तस्वरांनी बनलेले संगीतचे महत्त्व इतके आहे की ते मानवाला शांती देते. संगीत वनस्पतींना देखील उल्हासित करते. गोशाळेत चांगले संगीत लावले तर त्याचे गाईंच्या गर्भावरसुध्दा चांगलेच परिणाम होतात.
जो सत्ययुगातला पहिला मानव होता, ज्याची एकही चूक नव्हती, पाप नव्हते, कलंक नव्हता, दोष नव्हता, त्याच्याशी म्हणजे आपल्या त्या स्वरूपाशी, सगळे जन्म पार करून, आपण जोडले जाणे म्हणजे हे पूजन. जेव्हा आपण या चिन्हांचं पूजन आपण करतो तेव्हा सत्ययुगातल्या त्या निष्कलंक पुरुषाबरोबर आपण पूजन करतो.
श्रीमहासरस्वतीचे चिन्ह प्रथम धारिणीने काढली व परशुरामाने रेखाटले आहे.  महाविष्णूचा सहावा अवतार म्हणजे परशुराम, हा विवाहित होता व त्याच्या पत्‍नीचे नाव धारिणी होते, जी आल्हादिनी आहे. ही भूदेवी वरुणाची कन्या आहे. आपण नवरात्रीत जो कलश बसवतो त्याची पूजा करताना वरुणाचा उल्लेख येतो. पाऊस पडला की धारिणी फळते फुलते.
रेणुकेच्या विरहात परशुराम असताना अत्रि-अनसूया त्याला भेटायला येतात. तेव्हा धारिणी तिथेच असते. त्यावेळी तिच्या मनात सप्तस्वर झंकारत राहतात व ती धुळीत त्याप्रमाणे बोटं फिरवत राहते. तिच्या ह्या हालचाली परशुराम पाहतो आणि धुळीत धारिणीने बोटं फिरवल्याने जी प्रतिमा तयार झालेली असते ती प्रतिमा परशुराम चित्रांकित करतो. त्यातून श्रीमहासरस्वतीचे चिन्ह परशुरामाने काढले ज्याला रूप दिले धारिणीने.
वर्षातुन एकदा करायचे हे पूजन आपण सर्व श्रध्दावान अगदी प्रेमाने करुया.
ll  हरि ॐ  ll     ll  श्रीराम  ll                 ll  अंबज्ञ  ll