श्री गुरुचरण महिन्यात १ ० ८ वेळा हनुमानचलिसा का पठाण करावे ह्याचे महात्म्य सांगणारी कथा आधी बघुया.
संत तुलसीदासांच्या काळात काऴया कुविद्देच्या उपासकांनी गंगातीरावर एकमंदिर बांधले होते त्या मंदिराचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य केवळ हनुमंतामध्येआहे हे जाणून तुलसीदासांनी श्री हनुमंताना प्रसन्न करण्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाखाली बसून रोज तीन वेळा हनुमानचलिसा पठणास बसले . रोज तीन वेळा म्हणजे सकाळी १ ० ८ वेळा, दुपारी १ ० ८ वेळा व संध्याकाळी १ ० ८ वेळा आणि तेही तीस दिवस. तीस दिवसांनी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी हनुमंत प्रकट झाले व त्यांनी ती अपवित्र वाईटवस्तु नष्ट केली. त्यामुळे तुलसीदासांना अत्यंत आनंद झाला. त्यांना आनंदात बघून हनुमानजी तुलसीदासांना प्रश्न करतात की," तु एवढा आनंदित का? तुझे संरक्षण पहिल्यापासूनच होते". त्यावर तुलसीदासजी म्हणतात की "हनुमानजी मी आता सर्वांना सांगू शकतो की, आपल्या कडे भक्तीचा लवलेश ही नसताना दयाळु हनुमंतानी आपल्याला त्रास होऊ नये म्हणून ह्या अपवित्र वस्तुचा नाश केला आहे व आपले सर्वांचे रक्षण केले आहे. म्हणूनआपण सर्वजण हनुमंताचे स्मरण करूया. केवळ ह्या निमिताने तरी ते आपले (हनुमंताचे) नामस्मरण करतील."
त्यावर तुलसीदासांची निष्ठा तपासण्यासाठी हनुमंतजी त्यांना उलट प्रश्न करतात "तुझ्यावर विश्वास कोण ठेवील?". त्यावर तुलसीदासजी वादावादी न करता हनुमानजींना सांगतात "देवा तु म्हणतोस ते बरोबर", येवढे बोलून पुन्हा पठण करण्यास बसतात.
त्यानंतर हनुमानजी मानवी रुपात गावात जाऊन ४-5 जणांना सांगतात की,त्या वटवृक्षाखाली बसलेला म्हातारा पाखंडी आहे. तुम्ही जाऊन त्याला मारा.
हनुमंताच्या मुखातील हे शब्द ऐकताच ते सर्वजण काठयांनी तुलसीदासजीवर वार करतात व त्यांना दगडानी मारतात परंतु त्यांना काहीचं होत नाही,उलट दगड मारण्यारयाच्या उलटे येतात, ते सर्वजण घाबरतात व भीतीपोटी(प्रेमाने नाही) तुलसीदासांना शरण जातात. त्याचवेळी तुलसीदासजी त्यांना सांगतात "माझ्याकडे काही जादू नाही, हे सामर्थ आहे त्या हनुमंतांचे, त्याच्या हनुमान चालीसा पठणाचे, तुम्ही मारलेल्या दगडांची काठयांची फुले होतील व हनुमंताच्या चरणाशी पडतील, आणि तसेच होते. ते सर्वजण तुलसीदासजीकडे हनुमान चालिसा शिकू लागतात.
त्या रात्री पुन्हां हनुमानजी तुलसीदास बरोबर समोर प्रकट होऊन त्यांना विचारतात "तु एवढा खुष का? तुला काय मिळाले?", तुलसीदासजी उतरतात "तुझ्या नामाची गोडी सामान्य जनांना लागली, मला पाहिजे ते मिळालं", त्याला हनुमानजी तुलसीदासांना विचारतात "मग त्याने काय झाले?", त्यावर तुलसीदासानी दिलेले उत्तर त्यांच्या भक्तीची परमोच्च स्तिथी दर्शविते, तुलसीदासजी म्हणतात "हे मी जाणत नाही, ते तू आणि लोक जाणो. मी एवढेच जाणतो की, तू व तुझे नाम अतिशय सुंदर आहे, पवित्रआहे, तू काय करू शकतोस हे जाणून घेण्याची मला आवश्यकता नाही". कृपाळू हनुमंत प्रसन्न होतात व तुलसीदासांना सांगतात, "तू जे काहीमागायचं ते माग".
तुलसीदासजी अत्यंत विनम्रपणे हनुमंताना प्रार्थना करतात "हे दयाळू हनुमान जो कोणी ह्या तीस दिवसात म्हणजे वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा ह्याकालावधीत, घरात, मंदिरात, जंगलात, किंवा शक्य असेल तेथे कुठेही बसून ३0 दिवसातून १ दिवस केवळ एकदाच १ ० ८ वेळा हनुमान चालिसाचेपठण करील त्याचे तू रक्षण कर, मात्र तू माझी परीक्षा घेतली तशी त्यांची परीक्षा तू घेऊ नकोस ".
तुलसीदासांच्या मुखातील हे शब्द ऎकून हनुमानजी प्रसन्न होतात व"तस्थास्तु" म्हणून निघून जातात. तेव्हांपासून एका दिवसात १ ० ८ वेळाहनुमान चालिसा म्हणण्याची प्रथा सुरु झाली.
No comments:
Post a Comment